दिव्यांगांसाठी शासकीय योजना सुलभ करणारे UDID कार्ड | UDID Card Apply in Marathi

Spread the love

UDID कार्ड म्हणजे काय? (अपंग प्रमाणपत्र/दिव्यांग कार्ड)

नमस्कार मित्रांनो, आज आपण “UDID कार्ड” म्हणजेच अद्वितीय अपंगत्व ओळखपत्राबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला हे कार्ड असणे गरजेचे आहे. भारत सरकारने दिव्यांग व्यक्तींना एकसंध ओळख देण्यासाठी “UDID प्रकल्प” सुरु केला आहे, ज्यामुळे त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ होतो.
UDID कार्ड म्हणजे काय?

“Unique Disability ID” (UDID) प्रकल्पाचा उद्देश देशातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करणे आहे. या प्रणालीद्वारे, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसाठी संगणकीकृत स्वरूपात एक अद्वितीय ओळखपत्र जारी केले जाते. यामुळे दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ अधिक सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने मिळतो.


UDID कार्डाचे फायदे ( udid card benefits ):

एकाच कार्डाने सर्व माहिती:

udid card benefits


अपंगत्वाशी संबंधित विविध कागदपत्रांची आवश्यकता संपते. कार्डमध्ये सर्व तपशील समाविष्ट असतात.

सरकारी योजनांचा लाभ:
हे कार्ड शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सार्वत्रिक मान्यता प्राप्त आहे.

शिष्यवृत्ती:
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यास सोपे होते.

आयकर सवलत:
19% ते 40% अपंगत्वासाठी ₹75,000 पर्यंत, तर 80% पेक्षा जास्त अपंगत्वासाठी ₹1,00,000 पर्यंत आयकर सवलत मिळते.

राखीव नोकऱ्या:
सरकारी नोकऱ्यांमध्ये 4% आरक्षण मिळते.

बिझनेस लोन:
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी “NHFDC” मार्फत कर्ज उपलब्ध होते.

मोफत प्रवास:
फ्री प्रवास पास, मेट्रोसाठी 25% सवलत, आणि एअर इंडियाकडून 50% प्रवास सवलत मिळते.

घरकुल योजना:
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोफत घरकुल योजनेचा लाभ.

विवाह अनुदान:
राज्य शासनामार्फत विवाहासाठी ठराविक रक्कम दिली जाते.

इतर फायदे:
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, ई-श्रम कार्ड यासारख्या योजनांचा थेट लाभ.
स्कूटी आणि इलेक्ट्रिक सायकलसाठी विशेष अनुदान.

अर्ज करण्याची प्रक्रिया
कोण अर्ज करू शकतो?

कोणतीही पूर्ण किंवा आंशिक अपंगत्व असलेली व्यक्ती.

कुठे अर्ज करावा?

अधिकृत वेबसाईटद्वारे UDID पोर्टल

जवळच्या “महा ई-सेवा केंद्र” किंवा “CSC सेंटर” वर जाऊन.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी

UDID कार्डचा क्रमांक कसा असतो?

UDID कार्डचा क्रमांक हा 18 अंकी असतो.


यामध्ये राज्य, जिल्हा, वैद्यकीय अधिकारी, दिव्यांग कोड, जन्मवर्ष, आणि एक चेक राशी समाविष्ट असते.
वैधता.


कायमस्वरूपी कार्ड:

ज्या व्यक्तीचे अपंगत्व कायम आहे.

तात्पुरते कार्ड:

ज्या व्यक्तीच्या अपंगत्वात बदल होण्याची शक्यता आहे.

UDID कार्ड बनवण्याची प्रक्रिया :

ऑनलाइन अर्ज सबमिट:
अर्जदार पोर्टलद्वारे अर्ज सादर करतो.

पडताळणी:
जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) अर्जाची तपासणी करतात.

तपासणी व अहवाल:
तज्ञ डॉक्टर अपंगत्व तपासणी करून अहवाल तयार करतात.

अंमलबजावणी:
वैद्यकीय मंडळाचा निर्णय घेऊन CMO/DMO अर्ज मंजूर करतात.

कार्ड वितरण:
अर्ज मंजूर झाल्यानंतर कार्ड स्पीड पोस्टद्वारे पाठवले जाते.

UDID Card Download Pdf :

तुमचा अर्ज मान्य झाल्यावर तुम्हाला Email किंव्हा Text मेसेज द्वारे कळवण्यात येईल .

Approve झाल्यावर तुम्ही UDID कार्ड च्या वेबसाईट वर लॉगिन करून आपले UDID Card Download Pdf स्वरूपात download करू शकता .

संपर्क माहिती :

पत्ता: Room No. 517, B-2 Block, Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003
दूरध्वनी: 91-93549-39703 / 91-11-2436 5019
ई-मेल: disability-udid@gov.in

Conclusion ( निष्कर्ष ) :

“UDID कार्ड” दिव्यांग व्यक्तींसाठी केवळ एक ओळखपत्र नसून, त्यांच्या हक्कांचा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याचा एक प्रभावी साधन आहे.

जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली, तर कमेंट करून कळवा आणि अधिक अपडेटसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद!

Leave a Comment