आपण आज 7/12 Utara in Marathi Online 2023 या आर्टिकल मध्ये बघणार आहोत कि ऑनलाईन घर बसल्या कोणीही शेतीचा ऑनलाइन सातबारा बघणे कसा बघू शकतात आणि त्याची प्रत कशी काढू शकतात याची संपूर्ण माहिती बघणार आहोत .
शेतकऱ्यांना शेतीचा ७/१२ ची आवश्यकता कधीही पडू शकते आणि शेतकरी नेहमी नेहमी तलाठ्याकडे किंवा सेतू मध्ये जाऊन ७/१२ ची प्रत काढण्यासाठी जाऊ शकत नाही आणि गेला तरी त्यांना लगेच ७/१२ मिळेल याची खात्री नाही .
शासनाने शेतकऱ्यांसाठी bhulekh mahabhumi नावाचे पोर्टल चालू केले आहे जेणेकरून शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व कागदपत्रांचा शोध या वेबसाइट मार्फत घेता येईल.
सर्वांनी आर्टिकल लक्षपूर्वक वाचावे आणि काहीही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करावा.
7/12 utara म्हणजे काय ? । What is 7/12 utara information in Marathi ।
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसाच असल्यासारखा आहे . शेतात न जाता घरबसल्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपण या सातबारा उतारा मधून बघू शकतो.
महाराष्ट्राच्या सरकारने काढलेल्या जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनीच्या हक्कांबाबत वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात,त्यासाठी वेगवेगळ्या नोंदी साठी वेगवेगळे रजिस्टर सुद्धा असतात.
त्या रेजिस्टरमध्ये जमिनींच्या कुळांचे मालकी हक्क ,शेतजमिनीचे हक्क ,पिकांचे हक्क यांचा समावेश असतो तसेच यामध्ये २१ वेगवेगळे प्रकारच्या गावचे नमुने सुद्धा असतात .
यापैकी गावचा नमुना नंबर ७ आणि गावचा नमुना नंबर १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो ,म्हणून या उताऱ्याला ७/१२ उतारा असे म्हटले जाते.
खालील माहितीप्रमाणे ऑनलाइन सातबारा बघणे । 7/12 Utara online Website ।
तर चला बघूया खाली दिलेल्या स्टेप्सनुसार कसा तुम्ही सातबारा उतारा ऑनलाईन बघू शकता.
Step १ : सर्वात प्रथम तुम्हाला Mahabhumi Bhulekh हि वेबसाईट उघडावी लागेल.

वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे वेबसाईट चे Home Page तुम्हाला दिसेल.
Step २ : वेबसाईट वर तुम्हाला उजव्या बाजूला पांढऱ्या रंगाचा डब्बा दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल .
तुम्हाला तुमचा विभाग माहित नसेल तर तुम्ही जेव्हा तुमचा विभाग निवडाल त्याच बॉक्सच्या खाली तुम्हाला त्या विभागात कोणते जिल्हे येतात त्याची माहिती मिळेल.
तरीही तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये विचारू शकता .
विभाग निवडल्यानंतर Box च्या बाजूला असलेल्या Go या बटनाला दाबून पुढे जाऊ शकता.
Step ३ : Go बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर जिल्हा निवडण्याचे पेज दिसेल.

Step 4 : वरील फोटो मधील पेज वर तुम्हाला ७/१२ ,८ अ आणि मालमत्ता पत्रक असे ३ पर्याय दिसेल त्यापैकी ७/१२ या पर्यायावर क्लिक करा.

Step 5 : वरच्या इमेज मध्ये लाल बाण दाखवले तिथे क्लिक करा आणि नंतर जिल्हा निवडा .

Step 6 : जिल्हा निवडल्यावर तालुका निवडायचा पर्याय दिसेल तिथे क्लिक करून तालुका निवडा .

Step ७ : तालुका निवडल्यावर गाव निवडायचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुमचे कोणते गाव आहे ते सिलेक्ट करा.

Step 9 : लाल बॉक्स मध्ये असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय वर क्लिक करा नंतर समोर आणखी पर्याय दिसतील.

Step 10 : पर्याय निवडल्यावर तुम्हाला १ नंबरच्या बॉक्स मध्ये माहिती भरायची आहे जसे कि तुम्ही गट नंबर सिलेक्ट केला असेल तर तिथे गट नंबर टाकावा लागेल आणि जर आडनाव किंवा नाव सिलेक्ट केले असेल तर ते टाकावे लागेल.
नंतर २ नंबर म्हणजे शोधा या बटणवर क्लिक करावे लागेल.
क्लिक केल्यावर ३ नंबर बाण दाखवलेल्या बॉक्स वर क्लिक करून योग्य तो पर्याय निवडावा.
Step 11 : सर्व डेटा भरल्यानंतर तुम्हाला खाली दाखवलेल्या इमेज प्रमाणे दिसेल.

- वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व माहिती भरल्यावर ७/१२ या ४ नंबरच्या बटनावर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर समोर आजून एक पेज ओपन होईल.

Step 12 : शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला पांढऱ्या बॉक्सच्या बाजूला असलेला CAPTCHA Code भरून नंतर Verify Captcha to View ७/१२ या पर्यायावर क्लिक करा.
बटनावर क्लिक करताच तुम्हाला तुमचा ऑनलाईन सातबारा उतारा बघायला मिळेल.
Conclusion
Mahabhumi Bhulekh या website मुळे ऑनलाइन सातबारा बघणे आता एकदम सोयीचे झाले आहे त्यामुळे वर दिलेली माहिती लक्षदेवून वाचा आणि फ्री इंटरनेटचा फायदा घ्या.
तुम्हाला जर 7/12 Utara in Marathi Online Maharashtra 2023 हा लेख आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्र परिवारांना आणि शेतकरी बांधवांना नक्की पाठवून त्यांची मदत नक्की करा.तुम्हाला वर दिलेल्या माहितीवर काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कंमेंट मध्ये किंवा MarathiKen या आमच्या Whatsapp Group ला जॉईन होऊन विचारू शकता.
Mahabhumi Bhulekh या website मुळे ऑनलाइन सातबारा बघणे आता एकदम सोयीचे झाले आहे त्यामुळे वर दिलेली माहिती लक्षदेवून वाचा आणि फ्री इंटरनेटचा फायदा घ्या.
। धन्यवाद ।