आधार कार्ड अपडेट कसे करावे नवीन नियम लागू। Free Addhar Address Update News 2025

Spread the love

आधार कार्ड हे भारतातील ओळखीचा महत्त्वाचा पुरावा आहे. मोबाईल सिम घेणे, हॉटेल बुकिंग, रेल्वे तिकीट आरक्षण यांसारख्या विविध सरकारी व खाजगी सेवा मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असते.

त्यामुळे आधारवरील सर्व माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

याच पार्श्वभूमीवर, आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने आधार कार्डधारकांना दर 10 वर्षांनी त्यांची माहिती aadhar card update update करण्याचा सल्ला दिला आहे.

जर तुम्ही मागील 10 वर्षांमध्ये तुमच्या aadhar card update केला नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे.

मोफत आधार अपडेट सुविधा | Free Aaadhar card update update


UIDAI 14 जून 2025 पर्यंत आधार कार्डवरील माहिती ऑनलाइन मोफत अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. या तारखेनंतर अपडेटसाठी शुल्क आकारले जाईल. UIDAI चा सल्ला असूनही, आधार अपडेट करणे बंधनकारक नाही.

तुम्ही तुमचा पत्ता, मोबाइल नंबर, आणि ईमेल आयडी यांसारखी माहिती ऑनलाइन मोफत अद्ययावत करू शकता. मात्र, फोटो व बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल आणि त्यासाठी शुल्क आकारले जाईल.

आधार पत्ता कसा अपडेट करायचा? (स्टेप बाय स्टेप प्रक्रिया) | Aadhar card update update Address

१. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला (uidai.gov.in) भेट द्या.
२. मेनूमधील “My Aadhaar” पर्याय निवडा आणि “Update Your Aadhaar” या पर्यायावर क्लिक करा.
३. नवीन पृष्ठ उघडेल. त्यावर “Update Aadhaar Details (Online)” हा पर्याय निवडा. आधार नंबर आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
४. नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.
५. लॉगिन केल्यानंतर, अद्ययावत करायचा पर्याय निवडा आणि योग्य माहिती भरा.
६. माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि “Submit Update Request” या बटणावर क्लिक करा.
७. तुम्हाला एक विनंती क्रमांक (Request Number) मिळेल. या क्रमांकाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या विनंतीची स्थिती ट्रॅक करू शकता.

UIDAI च्या या सुविधेचा लाभ घेऊन तुमची आधार कार्ड माहिती वेळेवर अद्ययावत करा आणि त्रास टाळा.

Leave a Comment