“Groww म्युच्युअल फंड अ‍ॅपचा अनुभव: नवीन गुंतवणूकदारांसाठी योग्य का?” | Groww App Review in Marathi

Spread the love

गुंतवणूक करण्यासाठी Groww app खरंच योग्य आहे का ?

Groww app बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे लोकांना गुंतवणूक करायला थोडी असुरक्षितता वाटत आहे आणि हीच भीती लोकांच्या मनातून काढण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी Groww app review for mutual fund हे आर्टिकल घेऊन आलो आहोत.

आधीच्या काळात लोक पैशांची फक्त बचत करत होते पण आता लोकांना समजल आहे कि पैसा बचत करून नाही तर गुंतवणूक करून वाढवला जातो.

आजकाल mutual फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड चालू झाला आहे आणि बरेच लोक आपली गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या mutual fund स्कीम मध्ये आपला पैसा गुंतवण्याचा विचार केला आहे.

बाजारात mutual फंड मध्ये खूप सारे अँप्लिकेशन उपलब्ध आहे ज्याचा वापर करून तुम्ही आरामशीर कोणत्याही mutual फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.

त्यातूनच एक म्हणजे Groww app जे mutual फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध झाला आहे.

    Groww – Mutual Fund Investment

    Groww App हे mutual फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बनवण्यात आले आहे.
    भारतीय लोकांना सोप्या पद्धतीने आणि सुरक्षितरित्या आपला पैसा गुंतवणूक करता यावा या उद्देशाने या app ची निर्मिती करण्यात आली आहे.
    आता Groww app मध्ये तुम्ही शेअर मार्केट ची खरेदी/विक्री , mutual fund आणि Gold मध्ये एकदम सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता.

    Groww App is Safe or not – सुरक्षितता

    Groww App SEBI रजिस्टर कंपनी असल्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत तुम्ही निश्चिन्त राहू शकता.
    आणखी Groww app AMFI ( Association of Mutual Funds in India ) या संस्था अंतर्गत सुद्धा संलग्न आहे.
    Groww मध्ये उघडणारे प्रत्येक डिमॅट अकाउंट हे CDSL ( Central Depositary Service Limited ) या =कंपनीच्या सोबत संलग्न केलेले असतात.
    यामुळे सुरक्षेततेच्या बाबतीत Groww Safe आणि Secure आहे हे निश्चित आहे.

    Groww App Charges :

    Groww मध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाही अगदी फ्री मध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता.
    जर तुम्ही Equity Delivery करत असाल तर Stock खरेदी केल्यावर शून्य रुपये आणि stock विकताना सर्व Taxes मिळून १८ रुपये च्या जवळ जवळ चार्जेस लागतात आणि हे चार्जेस तुमच्याकडे किती stock आहे यानुसार बदलत असतात .
    Furture and Options  मध्ये trade करत अस्सल तर प्रत्येक buying आणि selling Order वर रुपये २० रुपये प्रत्येकी , म्हणजेच total ४० रुपये आणि Taxes अंदाजे १ लॉट साठी तुम्हाला ५० रुपये चार्जेस लागतात.

    ग्राहक सपोर्ट :

    ग्राहकांना मदत करण्यास यांची टीम थोडी कमजोर आहे.
    लवकर रिप्लाय न देणे, ग्राहकांच्या समस्यांचं पूर्णपणे समाधान न करणे.
    यामुळे ग्राहकांची थोडी निराशा होते
    Groww App फ्री खाते लगेच ओपन करा

    Groww App Review आणि Overview :

    बँगलोर मध्ये २०१६ स्थापन झालेली Groww कंपनी IPO ,Equity आणि Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याची सर्विस प्रदान करते.

    Nextbillion Technology Private Limited या कंपनीचा ब्रँड नाव म्हणून Groww हे app प्रसिद्ध आहे आणि हि कंपनी SEBI रजिस्टर StockBroker आहे आणि NSE व BSE मेंबर सुद्धा आहे.

    २०१६ मध्ये कंपनी फक्त mutual फंड गुंतवणूक हा पर्याय घेऊन स्थापन झाली होती.

    नंतर , २०२० च्या मध्यात त्यांनी equity शेअर ट्रेडिंग हा पर्याय उपलब्ध करून दिला.

    हळूहळू कंपनीने डिजिटल सोनं ,अमेरिकेच्या स्टॉक कंपन्या आणि फिक्स्ड deposit गुंतवणूक पर्याय आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले.

    Groww App Opening Charges आणि फीस :

    ग्रो हे app खाते उघडण्यासाठी कोणतीही फी आणि चार्जेस आकारात नाही , शून्य रुपयात म्हणजे फ्री मध्ये तुम्हाला ग्रो एप्लिकेशन मध्ये आपले खाते उघडू शकता.

    Mutual फंड मध्ये गुंतवणूक करणे आणि पैसे Withdraw करण्यासाठी ग्रो हे app कोणतेही चार्जेस लावत नाही तुम्ही एकदम फ्री मध्ये mutual फंड मध्ये फ्री मध्ये transactions करू शकता.

    शेअर मार्केट मध्ये प्रत्येक ट्रेड वर सर्वात कमी म्हणजे फक्त २० रुपये चार्ज द्यावा लागतो तसेच कितीही पैशाची ट्रेडिंग केली तरीही तुम्हाला फक्त २० रुपयेच चार्ज द्यावा लागतो.
    खाते उघडण्यासाठी चार्जेस : फ्री
    Mutual Fund Fee : फ्री
    स्टॉक ट्रेडिंग : प्रत्येक ट्रेडिंग वर फक्त २० रुपये चार्ज
    अकाउंट Maintainance चार्जेस : फ्री

    Groww कंपनीच्या चार्जेस बद्दल अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

    ग्रो कंपनीचे महत्वाचे घटक :

    • २०१६ पासून mutual फंड मध्ये गुंतवणूक सर्विस प्रदान करणारे App.
    • Nextbillion Technology Private Limited कंपनीचे ब्रँड नाव म्हणून प्रसिद्ध.
    • डिजिटल गोल्ड, शेअर मार्केट आणि Mutual फंड सारख्या सर्व्हिस प्रदान करणे.
    • IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
    • ९०+ लाख पेक्षा अधिक ग्राहक.
    • फ्री खाते ओपन.
    • फ्री अकाउंट maintainance.

    Groww Account Opening Documents आणि Process :

    Documents :

    • Email ID
    • Mobile Number
    • PAN कार्ड
    • बँक खाते
    • आधार कार्ड
    • मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे.

    Process :

    • सर्वात आधी ग्रो अँप डाउनलोड करा किंवा ग्रो वेबसाईट ओपन करा.
    • ई-मेल id आणि मोबईल नंबर टाकून रजिस्टर करावे.
    • रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकून मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा.
    • ओळख म्हणून PAN कार्ड नंबर Enter करावा.
    • बँक अकाउंट नंबर आणि IFSC code टाकून बँक अकाउंट व्हेरिफाय करून घ्या.
    • स्टॉक option मध्ये असलेल्या complete सेटअप option वर क्लिक करा.
    • Aggrement वाचून I Agree ला टिक करून घ्या.
    • Open stock account वर क्लिक करून स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनलॉक करा.
    • KYC प्रोसेस complete करण्यासाठी तुम्ही काय काम करता,कमाई ,वडिलांचे आणि आईचे नाव टाकून माहिती वव्हेरिफाय करून घ्या.
    • एका पांढऱ्या कागदावर सही करून त्याच्या फोटो काढून ते अपलोड करा.
    • अकाउंट ओपनिंग फॉर्म मध्ये e-sign पर्यायावर क्लिक करून पुढे प्रक्रिया चालू ठेवा.
    • आधारकार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर आलेला OTP टाका.
    • फॉर्म वर असलेल्या बाबी वाचून sign now वर क्लिक करा.
    • NSDL E-sign service portal वर आधारकार्ड नंबर टाकून Send OTP वर क्लिक करावे.
    • OTP टाकून अकाउंट ओपनिंग प्रोसेस पूर्ण करून घ्यावी.
    • अकाउंट चे document पडताळणी झाल्यावर काही तासात तुमचे अकाउंट Activate होऊन जाईल.

    टीप : जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारकार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्हाला अकाउंट ओपनिंग फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे ब्रोकर ऑफिसच्या पत्त्यावर पाठवावे लागतील.

    Groww App Real or Fake?

    Groww हे अँप mutual funds गुंतवणूक प्लॅटफॉर्म मम्हणून उदयास आले आणि स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्या नवीन आहे.
    Groww App १००% Real आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता असं माझं वैयक्तिक मत आहे.
    फक्त ग्राहकाच्या आधारावर आणि आतापर्यंत एकही compalint नाही यावरून कंपनी सुरक्षित होऊ शकते असे नाही.

    पण खालील दिलेल्या Parameter च्या आधारावर तुम्ही ठरवू कंपनी सुरक्षित आहे कि नाही.
    ग्रो हे अँप कोणतेही जोखीम युक्त सर्व्हिस प्रदान करीत नाही.
    २०१६ मध्ये चालू झालेली हि कंपनी फक्त mutual फंड प्रदान करून अगदी कमी काळात ९० लाख पेक्षा जास्त ग्राहकांचा टप्पा गाठला.
    भक्कम अश्या गुंतवणूक दारांचा ग्रो ला पाठिंबा आहे.
    Expert गुंतवणूकदाराना कंपनीच्या management वर खूप विश्वास आहे.कंपनी ला भेटत असलेल्या funding मूळे समजते कि कंपनीकडे त्यांचा विस्तार करण्याचे प्लॅन्स आहेत आणि long-term मध्ये ते त्यावर नक्की प्रयत्न करणार आहे.
    जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रो अँप खूप सारे मजकूर फ्री मध्य शेअर करत असते.
    मजकूर साठी कोणतेही पैसे आकारात नसल्यामुळे समजते कि त्यांना लोकांनां घोटाळ्यात फसवण्याचा काही विचार नाहीये.
    Groww हे app एकदम सुरक्षित आहे आणि हे app high level end-to-end encrypted आहे त्यामुळे तुमचा डेटा आणि transactions सुरक्षित असण्याचा विश्वास ग्रो कंपनी देत असते.

    सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्ही groww app review for mutual fund  हे आर्टिकल तुमच्यासाठी लिहिले आहे.

    Conclusion :

    सगळे गोष्टी बघता असे लक्षात येते कि गुंतवणूक करण्यासाठी Groww हे App योग्य आणि सुरक्षित आहे.

    तुम्ही निर्धास्त पणे Mutual फंड आणि स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता.

    Groww App Review blog मध्ये दिलेली सर्व माहिती reasearch करून तुम्हाला सांगितली आहे आणि जेवढं होईल तेवढं जास्त ज्ञान देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

    तरीही तुम्हाला जर या ब्लॉग बद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कंमेंट करून सांगू शकता किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधू शकता.

    तुम्हाला जर फक्त शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या अँपचा उपयोग करू शकता.

    एक क्लिक आणि Groww मध्ये फ्री खाते तयार.

    -8 Fun Website ज्या तुम्हाला bored होण्यापासून वाचावतील.
    – Windows १० चे अशे शॉर्टकट्स जे तुमचा खूप वेळ वाचवतील.काही समजलं नसेल आणि शंका असेल तर कंमेंट मध्ये विचारू शकता.

    टीप : खाते उघडताना काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनेल वर संपर्क साधू शकता.

    Leave a Comment