Whatsapp Account Ban झाले असेल तर हा उपाय करा । How to Solve ‘This Account Is Not Allowed to Use WhatsApp’ Problem ।

Spread the love

जर तुम्ही कोणतेही Third Party Whatsapp किंवा Mod केलेले Whatsapp ( GB Whatsapp ) असे काही वापरात असाल तर तुम्हाला ‘This Account Is Not Allowed to Use WhatsApp’ असा Error आला असेल किंवा भविष्यात येऊ शकतो.

याचाच अर्थ तुमचे Whatsapp Account Ban झाले आहे, म्हणजे तुम्हाला आता त्या नंबर वरून दुसरे अकाउंट ओपन नाही करता येणार.

पण जर असा प्रॉब्लेम आला तर यावर काही उपाय आहे का ? , का आता तुमचे Whatsapp अकाउंट आता कधीच उघडता येणार नाही.

This Account Is Not Allowed to Use WhatsApp या Whatsapp Account Ban Error बद्दल आपण सगळं काही जाऊन घेणार आहोत.

नक्की हा error का आला आणि यावर कोणकोणते उपाय आपण करू शकतो  जेणेकरून तुम्हाला पुन्हा तुमचे Whatsapp अकाउंट ओपन करता येईल.

चला तर बघूया ……….

    This Account Is Not Allowed to Use WhatsApp हा Error का येतो?

    जर तुम्हाला This Account Is Not Allowed to Use WhatsApp हा error दिसला तर समजा तुमचे Bad Luck असेल कि तुमचे अकाउंट banned करण्यात आले असेल.

    जर हा Error तुमच्या Whatsapp अकाउंट वर आला असेल तर याचे वेगवेगळे कारण असू शकते.

    Whatsapp कंपनीने सर्व details आणि तुमची Whastapp Activity बघूनच तुम्हाला Ban केले असावे.

    यामध्ये २ प्रकारचे Whatsapp बॅन असू शकते १ म्हणजे Temporary आणि दुसरा Permanant , Temporary Whatsapp अकाउंट ban झाले असेल तर ते पुन्हा सुरु करता येऊ शकते.

    परंतु जर Permanant Whatsapp Ban झाले असेल तर मग ते पुन्हा उघडणे खूप अवघड आहे.

    Whatsapp Account का Ban करत आहे:

    Whatsapp च्या मते त्यांनी खूप डेटा आणि Activity चेक करूनच लोकांचे Whatsapp अकाउंट Banned करीत आहोत.

    खालील काही कारणे आहेत ज्यामुळे लोकांना Warning न देताच त्यांचे Whatsapp Account Ban केले जात आहेत.

    १. Unwanted Messages :

    Unwanted Message किंवा Spam Message हे एक मुख्य कारण आहे Account बॅन होण्यामागे.

    जर कोणी व्यक्तीने तुम्हाला सांगितले असेल कि आता त्यांना message करू नका तर तुम्ही त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट आपल्या फोन मधून डिलिट करून पुन्हा त्यांना Message करू नये.

    नाहीतर बळजबरीने केलेले Message Unwanted Message म्हणून गृहीत धरले जातात.

    २. Automated Messages :

    जर तुम्ही Third-Party Apps चा वापर करून तुमच्या कोणत्याही कॉन्टॅक्ट ला Automated किंवा Continuous Message करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

    Automatic आणि Bulk Message Whatsapp वर सेंड करणे चुकीचे मानले जाते आणि हे कारण सुद्धा असू शकते तुमचे अकाउंट बॅन होण्याचे.

    ३. Unknown Contact ला Message करणे:

    तुमच्या Contact List ऐवजी सोडून जर तुम्ही इतर कोणाला स्पॅम Message करत असाल तरीही हि Invalid Activity धरली जाते.

    जर खूप लोकांनी तुमच्या Account ला Report केले तरी सुद्धा तुमचे Whatsapp Account Ban होऊ शकते.

    ४.Sharing Prohibited Content :

    इतर Instant Messageing apps प्रमाणे Whatsapp Prohibited Content शेअर करायला अनुमती देत नाही.

    Prohibited Content म्हणजेच Adult Content ,Hate Speeches ,Scam Links आणि इतर गोष्टी ज्या illegal आहे.

    ५. Sharing Malicious आणि Virus Files :

    Whatsapp वर attachment म्हणून Malicious File सेंड करणे मान्य नाही.

    जर Whatsapp ला कळले कि तुम्ही Virus असलेली Files सेंड करत आहेत तर तुम्हाला Permanantly सुद्धा Banned केले जाऊ शकते.

    ६. Whatsapp Mod Apps वापरणे :

    खूप साऱ्या user चे Whatsapp Account Ban होण्यामागचे कारण म्हणजे ते Whatsapp Mod APK चा वापर करतात.

    Whatspp Mod APK जसे कि GB Whatsapp , Pink Whatsapp , Whatsapp ++ आणि असे बरेच Mod Apk जे तुम्हाला जास्तीचे Features provide करतात पण यामध्ये रिस्क आणि private गोष्टी leak होण्याची संभावना असते.

    याच कारणामुळे Mod Whatsapp वापरणाऱ्या लोकांचे Whatsapp सर्वात आधी ban करण्यात येत आहे.

    This Account Is Not Allowed to Use WhatsApp या प्रॉब्लेम ला कसे सोडवावे :

    जर तुमच्या Whatsapp वर This Account Is Not Allowed to Use WhatsApp हा Message येत असेल तर तुमचे Whatspp Ban झाले आहे असे समजून घ्यावे.

    जर हे Temporary Ban असेल तर तुमचे अकाउंट recover होऊ शकते पण जर अकाउंट Permannat Banned झाले असेल तर खूप कमी Chances आहे कि ते पुन्हा Recover करता येईल.

    खाली दिलेले उपाय Try करून तुम्ही तुमचे Ban अकाउंट मिळवण्याचा प्रयत्न करू शकता.

    Whatsapp Contact ला Support करा :

    जर तुमचे अकाउंट banned झाले असेल तर लगेच Whatsapp Support Team ला कॉन्टॅक्ट करून त्यांना तुमचे अकाउंट Review करण्यासाठीं सांगू शकता.

    हा पर्याय तेव्हाच उपयोगात येऊ शकतो जेव्हा तुम्हाला वाटते कि तुमचे Whatsapp चुकीने Banned करण्यात आले आहे.

    जर तुम्हाला वाटत असेल कि तुमचे पण Whatsapp चुकीने banned झाले असेल तर खालील steps फोल्लो करून तुम्ही Recover करू शकता,

    • तुमचे Browser ओपन करून Whatsapp Contact या वेबसाईट वर जावे.
    •  Whatsapp Contact पेज वर Whatsapp Messanger Support वर क्लिक करा.
    • आता तुमच्या सर्व डिटेल्स fill करा म्हणजे मोबाइल नंबर ( Whatsapp ला Connect आहे तो ) , Email Id ज्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल ,तुम्ही कोणता Device चा वापर करता आणि तुमचा Message.
    • Message मध्ये तुम्हाला सांगायचे आहे कि का तुमचे Whatsapp Recover करायचे आहे.
    • तुमचा काही दोष नसताना तुमचे whatsapp ban झाले आहे हे सगळं Type केल्यावर Next Step वर क्लिक करायचे आहे.

    बस ! आता तुमचे  Whatsapp Ban हटवण्याची अपील Whatsapp कॉन्टॅक्ट Team कडे सबमिट झाली आहे.

    तुमची काही चूक नसेल तर  Review झाल्यावर तुमचे Whatsapp Ban अकाउंट नक्की Recover करण्यात येईल .

    Temporary Whatsapp Banned Recover करणे :

    जर तुम्हाला लवकरात लवकर Temporary Ban झालेलं Whatsapp अकाउंट recover करायचे असेल.

    तर तुम्हाला Whatsapp Team ला तुम्हाला तुमचा काय प्रॉब्लेम झाला आहे याबद्दल सर्व लिहून एक ई-मेल सेंड करावा लागेल.

    Email मध्ये दिलेल्या माहिती चेक करून तुम्हाला Whatsapp टीम तुम्हाला मदत करू शकेल.

    Whatsapp ला ई-मेल करण्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही काही Whatsapp वर चुकीचे काम केले नसेल.

    जर तुमची काहीच चूक नसेल तर Whatsapp टीम नक्की तुम्हाला Temporary Whatsapp Banned Recover करण्यात मदत होईल.

    Whatsapp Support Email : Support@Whatsapp.com

    Twitter वर कॉन्टॅक्ट करावा :

    जर user  how to unbanned from whatsapp quickly सर्च करीत असतील तर असे users Whatsapp सोबत कॉन्टॅक्ट करण्याचा तिसरा पर्याय आहे Twitter.

    जर तुमच्या ई-मेल ला Whatsapp कडून रिप्लाय आला नसेल तर तुम्ही Whatsapp च्या Official Twitter अकाउंट वर सुद्धा ट्विट करून प्रॉब्लेम सांगू शकता.

    कारण ट्विटर वर कंपनी Active राहत असतात त्यामुळे तुम्हाला लवकर रिप्लाय मिळू शकतो.

    तुम्हाला Whatsapp ला Mention करत तुमचा सर्व प्रॉब्लेम Type करायचा आहे आणि मग तुमच्या ट्विटर वर पोस्ट करायचा आहे.

    हेच ट्विट तुमच्या मित्रांना Retweet करायला सांगायचे आहे जेणेकरून तुम्ही फोकस मध्ये याला आणि Whatsapp तुम्हाला लवकर रिप्लाय देऊ शकेल.

    नवीन Whatsapp Account Open करा :

    जर वरील सर्व पर्यायांचा वापर करून सुद्धा तुमचे अकाउंट Recover होत नसेल तर तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर चा वापर करून नवीन Whatsapp अकाउंट ओपन करावे लागेल .

    कारण समजून घ्यावे तुमचे Whatsapp Account Permanant delete करण्यात आले आहे आणि ते आता Recover करणे अशक्य आहे.

    जर तुम्हाला वाटत असेल यापुढे तुमचे Whatsapp Account banned होऊ नये तर Whatsapp ने दिलेल्या सर्व Guidlines फोल्लो करूनच Whatsapp चा वापर करावा.

    Conclusion :

    तुम्हाला Whatsapp वर येत असलेल्या ‘This Account Is Not Allowed to Use WhatsApp’ या Error बद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली.

    कसे तुमचे Whatsapp Account Ban होते त्याची काय करणे आहेत ,यानंतर कोणत्या प्रकारे तुम्ही Whatsapp सोबत कॉन्टॅक्ट करून तुमचे अकाउंट Recover करू शकता.

    यावरून एक निष्कर्ष निघतो कि तुम्हाला Whatsapp Account Ban पासून वाचायचे असेल तर खालील टिप्स फॉलो करा:

    • Mod Apk चा वापर करणे टाळा.
    • Virus असलेल्या Files कोणालाही सेंड करू नका.
    • कोणत्याही अनोळखी व्यक्तीला उगाच message करू नका.
    • Spam आणि Malicous Message कोणालाही सेंड करू नका.
    • Adult Message सेंड करणे टाळा.
    • Whatsapp वर illegal Activity करू नका.

    वरील सर्व टिप्स फॉलो करा आणि Whatsapp Account Ban होण्यापासून वाचवा.
    पोस्ट चा तुम्हाला फायदा झाला असेल तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.
    आपल्या मित्र आणि परिवाराला पोस्ट शेअर करून त्यांचा सुद्धा फायदा करा.

    ! धन्यवाद !

    Leave a Comment